रावेर –रावेर विधानसभा मतदार संघाची शासनाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारींची प्रशिक्षण नुकतेच उत्साहात पार पडले. याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर-यावल तालुक्यातील मतदान केंद्र अधिकार्यांची प्रांतधिकारी डॉ. अभिजीत थोरबोले, रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे, यावल तहसीलदार कुंदन हीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्राबद्दल विविध स्वरूपाची माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तो पर्यंत प्रशिक्षण सुरु होते. यावेळी मोठ्या संख्येने रावेर यावल येथून अधिकारी वर्ग उपस्थित होते.