मतदानाची सक्ती करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार !

0

नवी दिल्ली: देशातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशातील प्रत्येक मतदानासाठी पात्र नागरिकांना मतदान सक्तीचे करावे या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून लावत देशात मतदान सक्तीचे करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. कोर्टाने याचिका फेटाळण्यानंतर देशाचे अॅटोनी जनरल यांनी याचिकाकरता निवडणूक आयोगाकडे जाईल असे म्हटले.