मतदारसंघातील तक्रार निवारणासाठी माजी आमदार चौधरींचे ‘लोकसेवक अ‍ॅप’

0

प्रकाश पोहरे यांच्या हस्ते अ‍ॅपचे लाँचिंग : स्व.बाळासाहेबांना अभिवादन

फैजपूर- आजचे युग हे धावपळीचे युग झाले कुणालाच कुठे वेळ मिळत नाही त्यातच आजची तरुण पिढी ही सोशल मिडीयाच्या आहारी गेली असून प्रत्येक नागरीक व महिलांसह सर्वांच्याच हातात स्मार्ट फोन पघायला मिळत आहे. कुठल्याही जगाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत रावेर यावल मतदारसंघातील नागरीरकांच्या तक्रार निवारणासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या संकल्पनेतून ‘लोकसेवक’ या नावाने अ‍ॅपचे लॉचिंग रविवारी लॉचिंग करण्यात आले. तत्पूर्वी खिरोदा येथे स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यातिथीनिमित्त अभिवादन सभा झाली.

माजी आमदारांचे बहुपयोगी अ‍ॅप
हे अ‍ॅप प्ले स्टोर वर लोकसेवक या नावाने उपलब्ध आहे. या अ‍ॅप मध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांचा विषय आहे असे नाही तर रावेर यावल तालुक्यातील सर्व गावांसाठी एक सांस्कृतिक, शैक्षणिक व सामजिक चेहरा बनेल असे हे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये लोकांसाठी देणार्‍या खूप सार्‍या गोष्टी देण्यात येणार आहे. त्यात शिरीष चौधरी यांच्या उपक्रमाच्या व कार्यक्रमाच्या दैनंदिन येणार्‍या बातम्या देण्यात येतील तसेच या परीसरात घडणार्‍या विविध घटना या व्यतिरिक्त नागरीकांना आवश्यक असणार्‍या सर्व उपयोगी लिंक आणि महत्वाचे कागदपत्र या अ‍ॅप वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नागरीक काही कारणास्तव माजी आमदार शिरीष चौधरी यांना भेटू शकणार नाही किंवा त्यांच्या काही तक्रारी व सूचना असल्या तर ते त्या अ‍ॅपवर आपल्या तक्रारी व सूचना नोंदवू शकतील आणि त्यांचे तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था असतील त्यांना या ठिकाणी जागा देण्यात येईल. लोकसेवक अ‍ॅप लॉच करण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की खर्‍या अर्थाने शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन वाढीस लागावे आणि नागरिकांचे सामाजिक परीवर्तन व्हावे यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. सोशल मिडीयाचा दुरुपयोग होवू नये आणि नागरीक जास्त अफवांवर विश्वास ठेवतात त्यासाठी जी खरी माहिती असेल तिच या अ‍ॅपवर दिली जाणार आहे.

लोकसेवक अ‍ॅपमधील वैशिष्टे
दिवसेंदिवस सोशल मिडीयाचा वापर झपाटयाने वाढत आहे त्याच अनुषंगाने लोकसेवक अ‍ॅप लॉच करण्यात आले आहे. यात बातम्या, कार्यक्रम, व्हिडीओ, टेक्स्ट, विंडोच्या संपूर्ण माहिती, थेट प्रक्षेपण, वेगवेगळ्या समूहातील माहिती, तक्रारी, सूचना आणि रावेर यावल मतदारसंघातील व्यावसायिक आहे त्यांच्या दुकानात काय साहित्य विक्री साठी उपलब्ध आहे ते नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम या लोकसेवक अ‍ॅप मध्ये उपलब्ध असेल.

मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा ध्यास -शिरीष चौधरी
मतदारसंघात विकासाच्या माध्यमातून चेहरा कुठे तरी बदलावा आणि सहज सोप्या पद्धतीने नागरीकांजवळ कसे जाता येईल हा माझा विचार मनात सुरू होता. सध्याचे सोशल मिडीयाचे युग आहे म्हणून लोकसेवक या नावाने अ‍ॅप तयार केले यात प्रत्येक माहिती देण्यात येईल. अ‍ॅप म्हणून हेच माध्यम राहणार नाही तर फेसबुक व सोशल मिडियाचे जेव्हडे माध्यम असेल त्या माध्यमातून आम्ही पोहोचणार आहे यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. नागरीकांना सोशल मिडीयाचा वापर करतांना काळजीपूर्वक वापर करावा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.