मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील

0

एरंडोल । मतदार संघात फीरत असतांना मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाराऊन गेलो असून,मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी केले. अखिल भारतीय मानव सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक अध्यक्षस्थानी होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, राष्ट्रवादी काँगेसचे शहराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, नगरसेवक असलम पिंजारी आदि प्रमुख पाहुणे होते.

जातीय सलोखा राखण्याचे मान्यवरांचे नागरिकांना आवाहन
यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन केले. शहरात जातीय सलोखा राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. युवकांनी जातीय अथवा धार्मिक कटुता मनात बाळगू नये, असे आवाहन केले. युवक हीच खरी देशाची संपत्ती असून सर्वांनी देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी हिंदू व मुस्लीम देशाच्या रथाचे दोन चाके असून देशात जातीय सलोखा व बंधुभाव कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. प्रत्येकाने आपापल्या परिसरात कोणताही धार्मिक वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधवा व गरीब महिलांना धान्य वाटप करण्यात आले. नगरसेवक असलम पिंजारी यांनी प्रास्तविक केले. आयाज शेख यांनी सूत्रसंचालन केले. सय्यद अ.सत्तार यांनी आभार मानले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास माजी नगरसेवक संजय चौधरी, शेख सांडू शेख मोहम्मद, अहमद सय्यद, हाफिज जुबेर शेख, डॉ.मुस्तकीम,सेवासंघाचे तालुकाध्यक्ष अल्ताफ शेख, आरिफ पर्वान्दार, शाराध्यक्ष जहांगीर शेखनुरा, शोएब पिंजारी, साजिद शेख चांद, हसन शेख मुनीर, नासीर पठान, जमील शेख, वासिम पर्वान्दार यांचे सह हिंदू व मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माशिडली पंच कमिटीचे अध्यक्ष हाजी र्ताफिक शेख, अजगर टेलर, नुरा शेख मोहम्मद, दौड खान, सलमान शेख, जुबेर शेख, मुनवर शेख, मोहसीन शेख यांचेसह संघाच्या पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले.