मतदारांचा पारदर्शकतेला कौल

0

मुंबई । महापालिका जिल्हा परिषदा आणि पंचाय समित्यांमध्ये भाजपला मिळालेले यश पारदर्शक कारभाराला दिलेला कौल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील युतीबाबतचा निर्णय हा पक्षाची कोअर समितीच घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंकजांचा राजीनामा स्विकारणार नाही
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जनतेने पारदर्शक कारभाराला दिलेला कौल आहे. मुंबईतील युतीचा निर्णय कोअर समिती घेणार आहे. एखाद्या निवडणुकीतील राजीनाम्याने फार काही बदलत नसते. यामुळे पंकजा यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार नाही. महापालिकेच्या 1066 जागांपैकी 521 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, जिल्हा परिषदेतही भाजपला उत्तम यश मिळाले जळगावात स्पष्ट बहुमत असून लातूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही भाजप पोहोचला.