मतदारांमध्ये जनजागृतीसाठी  नियोजन

0

मतदारांमध्ये जनजागृतीसाठी  नियोजन
जळगाव । शहरातील नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती आणण्यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरात अभिनव पद्धतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यात मतदान यंत्रांची दिंडी, पथनाट्य, मोबाईल अ‍ॅपव्दारे व्हिडीओ, अ‍ॅडीओ मॅसेज, लोकल टिव्ही चॅनलवर स्क्रोल जाहिरात आदींचा समावेश राहणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. मतदान जनजागृतीमध्ये मतदान यंत्रांची दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडींमध्ये 5 फूटाचे बॅलेट युनीट व 2 फूटांचा कंट्रोल असणार आहे. या कंट्रोलव्दारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तर महाविद्यालयांमध्ये जावून नवमतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी सिनेकलावंतांना बोलविण्याचे नियोजन सुरू आहे. या सिनेकलावंतांच्या रोड शोवव्दारे जनजागृती करण्याचे प्रस्तावित असल्याचेही माहिती चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.