दिल्ली रक्षा संपदा कार्यालयात बैठक उत्साहात
खडकी : अनधिकृत बांधकामांबाबत वगळण्यात आलेल्या मतदारांबाबत कायद्यात सुधारणा करुन मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावेत. या प्रमुख मागणीसह इतर अनेक प्रलंबित मागण्या बाबत खासदार व देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षांच्यावतीने नुकतेच दिल्ली येथे पार पडलेल्या रक्षा संपदाच्या बैठकीत ऐकमुखाने मागणी करण्यात आली.
रक्षा संपदाच्या चाणक्य हॉल येथे पार पडलेल्या या बैठकीस संरक्षण मंत्री निर्मला सितारमण, संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, रक्षा संपदा विभागाचे महासंचालक (डी.जी.) जोजनेश्वर शर्मा तसेच खासदार व कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष आदी उपस्थित होते. खडकी बोर्डाच्यावतीने खासदार अनिल शिरोळे, उपाध्यक्ष अभय सावंत व ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे सीईओ यांनी उपस्थित राहुन मागण्यांचे निवेदण दिले.
अनधिकृत बांधकामांबाबत वगळण्यात आलेल्या मतदारांसंदर्भात कायद्यामध्ये सुधारणा करुन मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट होण्याबाबत शासनाने पाऊले उचलावित. सध्या अस्तित्वात असलेला एक चटई क्षेत्र (एफ.एस.आय.) निर्देशांकांत बदल करुन साडे तीन ते चार स्वरुपाचा एफ.एस.आय.करावा. येथिल 16 एकर लष्करी जमिनीवर 6 झोपडपट्टी वसाहत असुन त्यांचे 6 एकर लष्करी जमिनीवर पुनर्वसन करुन उर्वरीत 10 एकर जमिन लष्कराने ताब्यात घ्यावी. जकात बंद झाल्याने तसेच एल.बी.टी.ची थकीत रक्कम अद्याप न मिळाल्याने बोर्डास आर्थिक चणचण भासु लागली आहे. केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक निधीची तरतुद केली जावी. अर्थसंकल्प मंजुरीचा अधिकार बोर्डास देण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह इतर रस्ते विकास कामांकरीता केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करुण द्यावा येथिल क्रीडा संकुलात नियोजित असलेल्या मैदाना करीता प्रस्तावित असलेल्या 5 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात यावी.