शिरूर । 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नवीन मतदार नोंदणीसाठी जागरूक राहण्याचे आवाहन तहसीलदार रणजीत भोसले यांनी केल आहेे. 1 जानेवारी 17 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी जागरूक राहून आपले नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. सध्या नवीन मतदान नोंदीची मोहीम सर्वत्र सुरू असून शासनाच्या निवडणूक विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आदी कर्मचार्यांची गावागावांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी भोसले यांनी नव्याने नोंद करण्यासाठी लागणारे कागदपत्रे तसेच विविध फॉर्म याविषयी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. दामोदर गरकल, तलाठी डी. आर. बोरा, ग्रामसेवक व्ही. आर. शिंदे, बीएलओ संदिप सोंडेकर, रजिष्टार समाधान कुंभार, माजी चेअरमन अशोक जगताप, सदस्य चंद्रकांत धनावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जगताप यांनी केले तर डी. आर. बोरा यांनी आभार मानले.