मतदार नोंदणीस महिनाभर मुदतवाढ

0

पिंपरी-चिंचवड । भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 1 ते 31 जुलै अखेरपर्यंत तरूण व प्रथम पात्र मतदारांची नोंदणी करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघात तरूण मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. मतदार नोंदणीपासून तरूण व पात्र मतदार वंचित राहू नयेत, यासाठी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एक जानेवारी 2017 रोजी ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आहेत; अशा सर्व युवक व युवतींनी नाव नोंदणी करावी.