वरणगाव। येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रभारी प्राचार्य अनंतराज पाटील यांच्या उपस्थितीत प्रा. अनिल शिंदे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले.
महाविद्यालयातील एकुण 53 विद्यार्थ्यांचे मतदार कार्ड तयार करण्यासाठी फॉर्म भरुन भुसावळ तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. प्रसंगी उपप्राचार्य के.बी.पाटील व प्रा. पी.बी. देशमुख, प्रा. राहुल संदाशीव, प्रा. सुभाष वानखेडे उपस्थित होते.