मतदार यादीतून ज्वाला गुट्टाचे नाव वगळले; मतदान न करताच परतावे लागले

0

हैद्राबाद- आज तेलंगणात विधानसभेसाठी मतदान सुरु आहे. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा देखील मतदानाला गेली होती. मात्र मतदान यादीतून चक्क त्याचे नाव गायब होते. मतदान यादीत नाव नसल्याने ती मतदान करू शकली नाही.

माझे नाव मतदारयादीतून कसे काय गायब झाले हे मलाही कळत नाही. मागील १२ वर्षांपासून मी तेलंगणची रहिवासी आहे. असे असतानाही माझे नाव मतदार यादीतून गायब झाले असेही ज्वाला गुट्टाने म्हटले आहे.

मतदार यादीतून माझे नाव तीन आठवड्यात गायब झाले असा आरोप बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केला आहे. २-३ आठवड्यांपूर्वी मी मतदार यादी ऑनलाइन चेक केली होती. त्यावेळी माझे आणि माझ्या आईचे नाव त्या यादीत होते. तर माझ्या वडिलांचे आणि बहिणीचे नाव यादीतून गायब होते असे ज्वाला गुट्टाने सांगितले आहे.