मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याची मागणी

0

वाडा । वाडा तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर 2017 मध्ये संपत असून येत्या दोन महिन्यांत या ग्रामपंचायतींच्या निवडणूका प्रस्तावित आहेत. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या 29 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र या याद्यांमध्ये प्रचंड घोळ व चुका असल्याने त्यातील त्रुटी दूर करा तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांच्या हरकतींची मुदत एक आठवड्याने वाढवा, अशी मागणी शिवसेनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आंदोलन छेडण्याचा इशारा
स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली असता ती तशीच ठेवणे, काही गावाच्या मतदार यादीत तर दुसर्‍या गावातील व परप्रांतीय मतदारांची नावे समाविष्ट करणे अशा प्रकारच्या चुका मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यांमध्ये केल्याचा आरोप शिवसेनेने निवेदनात केला आहे. योग्य ती कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.