मतमोजणीसाठी जागांची आयुक्तांकडून पहाणी

0

जळगाव । निवडणूकीपुर्व तयारींसाठी प्रशासनाच्या कामांना गती आली आहे. आज आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देवून मतमोजणी केंद्र उभारण्याबाबत तपासणी केली. आयुक्तांसोबत महापालिका अधिकारी देखील होते. आयुक्तांनी श्रीकृष्ण लॉन, नुतन मराठा सभागृह यांची पहाणी केली. वखार महामंडळाकडे मागणी केली असता त्यांनी नकार दिला आहे. पावसाळा असल्याने व मालचा स्टॉक जास्त असल्याने वखार महामंडळाने जागा देण्यास असमर्थता दाखविली आहे. दरम्यान, आयुक्त डांगे यांनी पहाणी केलेल्या श्रीकृष्ण लॉन व नुतन मराठा महाविद्यालय सभागृह या दोघ ठिकाणच्या मालकांशी चर्चा झालेली नसल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.