मतिमंद मुलीवर अज्ञाताकडून बलात्कार; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

0

नंदुरबार। जिल्ह्यातील अंबापूर ता.शहादा येथील मतिमंद मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसात अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहादा तालुक्यातील अंबापूर येथील एका 26 वर्षीय मतिमंद मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. गेल्या 9 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे मतिमंद तरुणी गर्भवती राहिल्याची फिर्याद वडिलांने म्हसावद पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.