जळगाव । शहरातील जीवराम नगर परिसरात असलेल्या उत्कर्ष मतिमंद विद्यालयात शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील मुलांना शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. मात्र ही शाळा शहराच्या एका टोकाला असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत यायला त्रास होत असतो. यामुळे मतिमंद मुलांकरीता महानगरपालीकेचे भोईटे शाळेची इमारत देण्यात यावी अशी मागणी उत्कर्ष मतिमंद विद्याललयाचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी शनिवारी महापौर नितीन लढ्ढा व आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.
महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, सुनिल माळी, रविंद्र पाटील, विजय गेही यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ.तुषार फिरके, प्रविण चौधरी, समीर पाटील, हर्षाली चौधरी, गणेश पाटील यांच्यासह 50 हुन आपल्याअधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त जीवन सोनवणे यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी पालक व शिक्षक चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. महानगर पालिकेकडे वेळोवळी पत्रव्यवहार करून देखील मतिमंद विद्यार्थ्यांचा प्रश्नासंबधि प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला.
अहवाल मागवणार
या निवेदनात म्हटले होते की, विद्यालय हे शहराच्या एका टोकाला भरत असल्यामुळे मुलांना शहरातून स्कूल बसने शाळेत घेवून यावे लागत असते. विद्यार्थ्यांचा अर्धा वेळ बसमध्येच जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यामुळे शाळेस शहराच्या मध्यवर्ती ठिकाणात इमारत मिळावी अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे. याबाबत महापौर यांनी पालक व शिक्षकांचे म्हणने ऐकून, भोईटे शळा मतिमंद विद्यार्थ्यांना देण्यात यावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अहवाल मागवून घेणार असल्याचे आश्वासन दिले.