चाळीसगाव : शहरातील नेताजी चौक येथील रहिवासी व चाळीसगांव पोष्ट खात्यात नोकरीस असलेले सुजित शांताराम माळी यांच्या मातोश्री यांचे निधन 12 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले होते. त्यांचे वर्षश्राद्ध 19 नोव्हेंबर 2017 रोजी होते. त्यानिमित्त रितीरिवाजा ने समाजाच्या प्रथे प्रमाणे त्या दिवशी मित्र परीवार नातेवाईक यांना जेवन देत असतात. मात्र त्यास फाटा देत माळी परीवाराने चाळीसगांव धुळे रोडस्थित असलेल्या मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना 19 रोजी अन्नदान करून हिवाळा असल्याचे लक्षात घेउन 40 मतिमंद विद्यार्थ्याना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
आई वडीलांच्या संस्कारामुळे समाजकार्य – अमित माळी
स्व. शशिकला शांताराम माळी यांचे 12 डिसेंबर 2016 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते स्व .शशिकला माळी यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे त्यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी माळी परीवारातील सर्व सदस्यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला होता. तसाच आदर्श त्यांनी आईचे वर्षेश्राद्ध परपंरेप्रमाणे न करता त्यांनी धुळे रोड येथील नर्मदेश्वर संचलित मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्याना ब्लॅकेटसचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या निर्णयाचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे. अमित माळी यांनी सांगितले की, आई वडीलांच्या संस्कारामुळे आम्ही समाजकार्य करत असून कृती फाउंडेशनच्या माध्यमातून यापुर्वी थॅलेसेमीया ग्रस्त रुग्नाचे हीमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करुन त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याहस्ते कामोम्प लॅब मशीन देण्यात आली. या आजाराने रुग्नामध्ये रक्त तयार होत नसते. कामोम्प लॅब मशीनने रुग्नाची तपासणी 1 सेंकदात होते. ह्रदयरोग व इतर आजारावर आरोग्य शिबिरे घेउन 10 हजार रुग्नाना मोफत औषधी वाटप, रक्तदान शिबीर नेत्ररोग, शिबीर तसेच ए.बी. हायस्कूलच्या दोन विद्यार्थीना (विद्यार्थी व विद्यार्थीनी) शिष्यवृत्ती प्रतिवर्ष फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येते. महिला सबलीकरण व सक्षमिकरण करण्याचे मोठे कार्य फाउंडेशनच्या वतीने जेष्ठ नागरिक आरोग्य शिबीर, 280 मुले त्यांनी आज पावेतो दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत.
यांची होती उपस्थिती
यावेळी शांताराम माळी, सुजित माळी, जयश्री माळी, संपदा माळी, मनिष माळी, संगिता माळी, अमित माळी, डॉ.श्रद्धा माळी, स्मिता देवरे, सुरेश देवरे, संकेत देवरे स्पंदन माळी, ओजस्वी माळी, सार्थक माळी, संकल्प देवरे यांच्यासह दिपक पाटील, तुषार महाजन, मयूर महाजन, रमेश पोतदार, वैभव चव्हाण यादी यावेळी उपस्थित होते.
समाजाने आता काळानुरूप बदलले पाहीजे – गणेश पवार
यावेळी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार म्हणाले की माळी परीवाराने आईचे वर्षश्राद्धचा कार्यक्रम वंचित घटकातील मतिमंद विद्यार्थ्याना अन्नदान व ब्लॅकेटस वाटप केले. आपण वर्षश्राद्धला नातेवाईक व मित्रपरीवाराला आमंत्रित करून कार्यक्रम साजरा करत असतो. मात्र आपण मतिमंद विद्यार्थ्यांना मदत करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. माळी परीवारांचे कौतुक करत समाजाने आता काळानुरूप बदलले पाहीजे कारण आपण समाजातील वंचित घटकांचे काही देणे लागतो याचे भान ठेवुन समाज हिताचे कार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.