मतीमंद विद्यालयात आत्ममग्न दिनानिमित्त कार्यक्रम

0

नंदूरबार । येथील काकूमाय बहुउद्देशीय संस्थेच्या मतीमंद विद्यालयात आत्ममग्न दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजेश चौधरी बाजीराव पाटील, लक्ष्मण मराठे, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आसिफ शेख, सचिन करणकाळ आदी उपस्थित होते.

मतीमंद मुलींची हेळसांड न करता त्यांनाही शासनाने सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रा.भास्कर कुवर यांनी यावेळी व्यक्त केले. समाजकल्याण निरिक्षक गोरे यांनी मतीमंद विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. आत्ममग्न मुले हे व्याधी नसून त्यांच्यात चांगल्या प्रकारे बदल घडवून आणला जावू शकतो असे मुख्याध्यापक ज्ञानेश्‍वर कोळी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार भारती कुवर यांनी मानले.