मदत वाटपातही कॉँग्रेसच्या मंत्र्याची ‘चमकोगिरी’!

0

नागपूर : लॉकडाऊनचच्या काळात गरीब व सर्वसामनन्यांना मदतीचा हात देणण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. मध्यंतरी मदत करताना सेल्फीघेत चमकोगिरी करणार्‍यांवर टीकेची झोड उठली होती मात्र आता कॉँग्रेसचे नेते तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे छायाचित्र असलेल्या पाकिटात खाद्यपदार्थ वितरित करणण्यात येत असल्याचा चमकोगिरीचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे.

डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनात काम करीत असलेल्या संकल्प सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दररोज दहा हजार जेवणाची पाकिटे वितरित केली जात आहेत. ते तयार करण्यासाठी ठवरे कॉलनीतील एका भवनात व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी युवक काँग्रेस तसेच इतर कार्यकर्त्यांची फौज काम करीत आहेत. जेवणाच्या पाकिटांवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे छायाचित्र चिकटवण्यात येत आहे. तसेच संबंधित ठिकाणी त्यांचे फलकही लावण्यात आले आहेत. पाकिटांवर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाच्या खाली ‘मदतीचा हात’ असे लिहिले आहे.