शिरपूर। येथील मदनी बहुउद्देशीय फाऊंडेशनतर्फे गरिब मुले व मुलींना शालेय गणवेश व वह्याचे वाटप नुकतेच मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू स्कूल, सुभाष कॉलनी येथे करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुषार रंधे, राहुल रंधे, रोहित रंधे, आशा रंधे यांच्यासह नगरसेवक हर्षल राजपूत, सलिम खाटीक, राजू शेख, राजेश सोनवणे, हाजी हुसेन तेली, हाजी सत्तार अली, हाजी सिराज तेली हाजी समद तेली, तसेच फाऊंडेशनेच संस्थापक अध्यक्ष हमीद तेली, उपाध्यक्ष सिराज तेली, सचिव अशपाक तेली, सहसचिव जाकिर सनन तेली, खजिनदार आरिफ तेली, सदस्य मोहसीन तेली, सरवर तेली, जावीद राठोड, इदरिस तेली, आरमान शेख, अशपाक खाटीक, तबरेज खाटीक इत्यादींच्या हस्ते वाटप करण्यात आले.