मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळांवरून घसरला

0

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेसचा एक डबा आज पहाटे खंडाळ्याजवळ रुळावरून घसरला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. कोणी जखमीही झालेले नाही. मात्र मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या अपघातामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे सिंहगड, प्रगती आणि इंटरसिटी एक्स्प्रेस, कर्जत-पुणे पॅसेंजर या गाड्यांच्या दोन्ही बाजूंच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली आहे.  अपघातग्रस्त एक्स्प्रेसची बोगी कापून बाजूला काढण्यात आली असून, उर्वरित गाडी पुढे रवाना करण्यात आली आहे.