लोटगाड्यांवर दारु पिणे भोवले
डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांची कारवाई
प्रत्येकी 1250 रुपये दंड
जळगाव- शहरात उघड्यावर मद्यप्राशन तसेच मद्य पिवून वाहन चालविणार्या मद्यपींवर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांच्यातर्फे कारवाईची मोहिम राबविण्यात येत आहे. यात पाच दिवसांमध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक जागी, लोटगाड्यांवर मद्यप्राशन करणार्या आठ जणांना स्वतः डॉ. रोहन यांनी कारवाई करुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने प्रत्येकी 1250 रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत उभे न्यायालयासमोर उभे राहण्याची शिक्षा सुनावली आहे.
शहरात शहर पोलीस ठाण्यात हद्दीत गस्त घालत असताना पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांनी उघड्यावर तसेच लोटगाड्यांवर मद्यप्राशन करणार्या सहा इसमांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुर नं 6 10/19 प्रमाणे मुंबई प्रोव्हिशन कलम 8 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याचप्रमाणे 6 रोजी डॉ. रोहन यांनी गस्तीवर असताना आणखी दोन जणांना ताब्यात घेवून शहर पोलिसात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
प्रत्येकी 1250 रुपये दंड
डीवायएसपी डॉ. रोहन यांनी सर्वांना ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या बे्रथ अॅनालायझर मशीनव्दार तपासणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात येवून सर्व 8 जणांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी 1 हजार 250 रूपये दंड व न्यायालय सुटेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे आठही जणांना एकूण 10 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान कारवाई सुरुच राहणार असल्याचे डॉ. निलाभ रोहन यांनी नागरिकांनी उघड्यावर दारु पिऊ नये तसेच मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये असे आवाहन केले आहे.