मद्यपीने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

जळगाव – शहरातील दूध फेडरेशन परिसरात असलेल्या भारतनगरात राहणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मद्यपी तरूणाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतनगरात राहणार्‍या विद्यार्थिनीला मंगळवारी दुपारी तिच्या आईने रेल्वे गेटपर्यंत घरी जाण्यासाठी सोडले. तरूणी घरी पायी जात असताना दूध फेडरेशनजवळ रस्त्यावर एका झाडाखाली उभ्या असलेल्या मद्यपी तरूणाने तिला पकडले. यावेळी रस्त्याने जाणार्‍या दोन महिलांनी तिची सुटका केली. तरूणीने घरी जावून तिच्या वडीलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तरूणीची छेड काढणार्‍या शेख असिफ शेख नबी या तरूणाला ताब्यात घेतले आहे.