जळगाव । जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे तसेच धुम्रपान करणे व मद्यप्राशन करून फिरणार्यांना पकडून पकडून जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी चक्क जिल्हा रूग्णालयात दारू पिऊन फिरणार्या डॉक्टराला पकडून जिल्हाशल्सचिकित्सक चव्हाण यांनी दंडात्मक कारवाई केली. यात त्याच्याकडून शंभर रूपये दंड आकारण्यात आले.
दंडावरून पथकाशी घातला वाद
जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक नागुराव चव्हाण यांना त्यांच्या कार्यालय परिसरात डॉ. दिनेश बाळासाहेब खेताळे हे दारूच्या नशेत फरतांना दिसून आले. त्यांनी लागलीच पथकातील मुकादम रविंद्र पवार, संयोजक बर्हाटे यांना बोलवून डॉ. खेताळे यांना पकडून जागेवरच दोनशे रूपयांचा दंड करण्याच्या सुचना केल्या. कारवाई करत असतांना पथकाने दोनशे रूपयांचा दंडाची पावती दिल्यानंतर खेताळे यांनी चक्क पावती फाडून दंड भरण्यास नकार दिला. यानंतर खेताळे यांच्याकडून शंभर रूपये दंड आकारण्यात येवून पुन्हा मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास पुन्हा कारवाई करण्यात येईल अशी तंबी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खेताळे यांना दिली.