मद्यपी तरूणांकडून दुकानांवर दगडफेक

0

जळगाव । क्रिकेट खेळण्यास विरोध केल्याने मद्यपी तरुणांनी बळीराम पेठेतील साजनदास व्यापारी संकुलातील तीन दुकानांवर दगडफेक केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता घडली. यात सनी ट्रेडर्स, बबल गारमेंट व ज्योती फुट वेअर या तीन दुकानांच्या काचा फुटल्या असून प्रत्येकी 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बळीराम पेठेत भाजी मार्केटला लागून साजनदास व्यापारी संकुल आहे. त्यात विजयकुमार कौरानी यांच्या मालकीचे सनी ट्रेडर्स, शामलाल तलरेजा यांच्या मालकीचे बबल गारमेंट व अजय मेघानी यांच्या मालकीचे ज्योती फूट वेअर या नावाने दुकान आहे. या व्यापारी संकुलाच्या समोर रात्रीच्या वेळी काही तरुण क्रिकेट खेळतात. शनिवारी रात्री माल घेवून ट्रक आल्याने या दुकानदारांनी क्रिकेट खेळणाजया तरुणांना विरोध केला. त्याचा राग आल्याने दोन मद्यपींनी दुकानावर दगडफेक केली. त्यात तिन्ही दुकानांच्या काचा फुटल्या. यावेळी मद्यपींनी धिंगाणा घातल्याने वातावरण चिघळले होते. मद्यपींकडून दगडफेक झाल्याने पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी रात्री एक वाजता घटनास्थळ व शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर रात्री रस्त्यावर धिंगाणा घालणाजर्‍या अश्विन सुरेश भोळे (वय 32) व बिपीन दीपक पवार (वय 30) दोन्ही रा.बळीराम पेठ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.