मद्यपी पोलिस धुळे शहरातून बेपत्ता

धुळे : जळगाव येथील मूळ रहिवासी व मीरा भाईंदर पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस श्हारातील पोलिस प्रशिक्षण केंद्रातून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी हाच पोलिस दारूच्या नशेत आढळला होता तर कर्मचारी हरवल्याने त्याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

कर्मचारी झाला बेपत्ता
प्रशिक्षण केंद्रात सध्या नवप्रविष्ट कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते आहे. या ठिकाणी मीरा भाईंदर आयुक्तालयातील कर्मचारी रोल क्र 544 किरण संजय चौधरी (रा. दादावाडी, कल्याणी नगर, प्लॉट नं. 27, जळगाव ) प्रशिक्षण घेत होता.