जळगाव। तालुक्यातील कानळदा गावी उपसरपंचाला पोलिस पाटीलासह अन्य तिघांनी मारहाण केल्याची घटना 28 रोजी रात्री 7.45 सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात पोलिस पाटील यांच्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानळदा गावात 28 रोजी सायंकाळी रोजी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
याबाबत उपसरपंच प्रकाश पंढरीनाथ सपकाळे यांनी पोलिस पाटील नारायण गोकुळ पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्यात वाद झाला. यावेळी दारुच्या नशेत असलेले पोलिस पाटील नारायण पाटील यांनी उपसरपंच प्रकाश सपकाळे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर भैय्या गोकुळ पाटील, चंद्रकांत नवल पाटील व पिंटू सुभाष पाटील यांनी पुन्हा उपसरपंच प्रकाश सपकाळे यांना मारहाण केली.