धुळे । येथील जयहिंद कॉलनी, न्यू गुलमोहर कॉलोनी, श्रीराम नगर, प्रभाग 7 मधील रहिवाशांनी झेड. बी. पाटील महाविद्यालय समोरील प्लॉट नं.3, विजया बिझनेस हाऊस येथील गाळा क्रमांक 25 आणि 26 येथे नवीन वाईन शॉप, परमिट बियर बार सुरू होत आहे. यास वाणिज्य परवाना देण्यात येवू नये अशी मागणी जिल्हाधिकारी दिलीप पाढरपट्टे व आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेकायदेशीर दारू दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखो रुपये लाच घेवून परवानगी दिली आहे असा आरोप करण्यात येत आहे. या करीता सुरू होणार्या दारू दुकानाला त्वरित प्रतिबंध करावा तसेच ते तेच्या मूळ जागी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेविका प्रतिभा चौधरी, नागसेन बोरसे, मिलींद मुडावदकर, प्रा.सागर चौधरी, केदार जोशी, प्रशांत भदाणे, अभय शिंदे, अशोक सरोदे आदींनी केली आहे.