मद्यविक्री विरोधात मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा

0

चाळीसगाव । न्यायालयाच्या दारुबंदीच्या आदेशानंतर देखील चाळीसगाव तालुका व शहरात सर्रासपणे अवैध व बनावट देशी विदेशी दारु विक्री सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करुन देखील अवैध दारू विक्री बंद होत नसल्याने दारू बंदी विभागाचे आर्थिक हित संबंध असल्याचे दिसून येत असून अवैध मद्यविक्री बंद न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा रयत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. राज्य उद्पादन शुल्क विभागाचे नाशिक उपआयुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, पंकज पाटील, मयुर चौधरी, शुभम देशमुख, प्रंशात अजबे, मुकुंद पवार, भरत नवले, विलास मराठे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.