नवी दिल्ली । आठवडी बाजारात कत्तलीसाठीच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्याच्या बंदीमागे गोमांसबंदीचा निर्णय अप्रत्यक्षपणे राबवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत केरळ आणि मद्रासमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मद्रासच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) बीफ महोत्सव आयोजित करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काल रात्री पार पडलेल्या या बीफ महोत्सवात संस्थेतील साधारण 50 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी 27 मे रोजी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांकडून त्रिवेंद्रम विद्यापीठाबाहेर अशाचप्रकारचे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर केरळात अनेक ठिकाणी बीफ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे या तिघांनी गायीच्या एका वासराला सार्वजनिक ठिकाणी आणून त्याची कत्तल केली. त्यानंतर या वासराचे मांस लोकांना वाटण्यात आले. आठवडी बाजारात कत्तलीसाठी जनावरांची खरेदी आणि विक्री बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते. दरम्यान, काँग्रेसनेही या कृत्याचा निषेध करत कार्यकर्त्यांना निलंबित केले आहे. हे कृत्य म्हणजे अविचारी, रानटी आणि पूर्णपणे असमर्थनीय असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सांगितले. अशा कृत्यांना स्थान नसल्याचे म्हटले आहे.
तत्पूर्वी केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी गायीच्या वासराची कत्तल केल्याप्रकरणी सोमवारी युथ काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना सोमवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कन्नूर युथ काँग्रेसचे अध्यक्ष राजील माकुट्टी यांच्यासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली होती.