फैजपूर- स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शनिवार, 21 रोजी सकाळी 9 वाजता ‘एमएचटी सीईटी 2018’ परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षेचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही परीक्षा कश्या पध्द्तीने मुलांना सोपी जाईल यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.
मॉक टेस्ट परीक्षा ही राज्यात एकाच वेळी विविध केंद्रावर ऑनलाईन घेतली जाणार आहे. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा झाल्या असून बारावीच्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना प्रमुख परीक्षेचा सराव व्हावा या हेतूने हे आयोजन करण्यात आले.
21 रोजी ऑनलाईन ‘मॉक टेस्ट’
महाराष्ट्रात प्रथमच मॉक टेस्ट ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतला जाणार असून पालकांनी आपापल्या पाल्याला सोबत घेऊन यावे आणि एमएचटी सीईटी 2018’ परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करावे तसेच विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असल्यास थेट प्रश्न विचारण्याची मुभा या ठिकाणी दिली जाणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवार, 21 रोजी स्व.लोकसेवक मधुकर चौधरी फार्मसी महाविद्यालयात मॉक टेस्ट प्रशिक्षणासंदर्भात उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांनी केले आहे.