फैजपूर। येथील मधुकर साखर कारखान्याने 1 लाख 86 हजार 735 मेट्रीक टन ऊसाचे यशस्वीरित्या गाळप केले. त्यामुळे सन 2016-17 चा गाळप हंगामाचा मंगळवार 31 रोजी रात्री 11 वाजता ऊस तोड व वाहतुक उपसमिती चेअरमन संजीव महाजन यांच्या हस्ते समारोप करण्यात आला. याप्रसंगी कारखान्यास सहकार्य करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पदाधिकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला ऊस कारखान्यास पुरवठा करुन सहकार्य केल्याबद्दल व कारखान्याच्या सर्व सभासद, अधिकारी, कामगार प्रतिनिधी, कामगार, ऊस तोडणी मजूर, वाहतुक, ठेकेदार, शुगर हाऊस ठेकेदार व इतर ठेकदारांनी तसेच जिल्हा बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल चेअरमन शरद महाजन यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक लिलाधर चौधरी, नितीन चौधरी, अतुल चौधरी, अनिल महाजन, मिलींद नेहेते, ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र महाजन, अनिल बडगुजर, गिरीष कोळंबे, कार्यकारी संचालक महेश सगरे आदी उपस्थित होते.