मधुकर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत सापडला तरुणाचा मृतदेह

0

फैजपूर– आमोदा शिवारात असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या राखीव पाण्याच्या टाकीत पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. विश्वकर्मा टाकसाळ असे मयत तरुणाचे नाव आहे. आमद्याचे पोलीस पाटील तुषार पाटील यांना एका व्यक्तीचा भ्रमणध्वनीवर घडलेल्या घटनेचा फोन आला होता. यावेळी त्यांनी तत्काळ फैजपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. संबधित तरुणाचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढला असता तो तरुण येथून जवळ असलेल्या जीवरामनगर या वस्तीतील ऊस तोडणी मजूर असल्याची ओळख पटली.