फैजपूर । येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याने सिझन 2016-17 साठी झालेल्या उसाच्या गाळपाचे उत्पादकास यापुर्वी 1800 रुपये प्रमाणे मे.टन.प्रमाणे उचल अदा केलेली असून मसाकाचा उसाचा दर 2100 मे.टन जाहीर केल्याने उर्वरीत तीनशे रुपये बुधवारी 12 रोजी उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. चेअरमन शरद महाजन यांनी दिली. उर्वरीत रक्कम अदा करण्यात आल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कारखान्यांचे संचालकांनी आमदार एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांचे आभार मानले आहे.