नवी मुंबई । मधुमेह हा एक घातक रोग आहे. यावर वेळीच उपाय केला नाहीतर डोळ्यावर यघातक परिणाम होऊन पूर्णपणे अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यासाठी मधुमेहावर नियंत्रण मिळविण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ डॉ. प्रशांत थोरात यांनी घणसोली येथे उपस्थितांना केले. जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून घणसोली सेकटर 7 येथील महानगर पालिकेच्या शाळेत कार्यक्रमाचे आयोजन प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. थोरात युनिक आय रुग्णालय यांच्यावतीने आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योवळी 300 रुग्ण व नागरिक उपस्थित होते.
आयुर्वेदातील दिनश्चर्येला अनन्यसाधारण महत्व
मधुमेह वर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषधे, आहार, व्यायाम, आयुर्वेदातील दिनचर्या याचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे केल्यास आपण मधुमेहावर नियंत्रण ठेऊ शकतो असे मत आहार तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी कुरे यांनी व्यक्त केले. तर मधुमेहावर प्रभाव मिळविण्यासाठी योगा कसा करायचा याचे मार्गदर्शन योगा तज्ज्ञ वंदना कुचिक यांनी केले. रेटिना तज्ज्ञ रामचंदणी यांनी मधुमेहाचे डोळ्यावर होणार्या परिणामांची माहिती दिली. तर आयुर्वेदाचार्या आश्लेषा थोरात यांनी आयुर्वेदात मधुमेहावरील उपचारांची माहिती दिली.