फैजपूर- मधुस्नेह संस्था परीवारातर्फे रावेर मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी मधुस्नेह परीवाराचे प्रमुख माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील होते. याप्रसंगी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अॅड.संदीपभैय्या पाटील, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी राजू तडवी, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. ईशस्तवन- कल्पना गावंडे , पंकज वानखेडे यांनी सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले. विद्यार्थी हार्दिक बेंडाळे, दर्शना चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
सोशल मिडीयात गुंतू नका -मान्यवरांचा सूर
सूर्यवंशी, राजू तडवी, रमजान गुरुजी, संदीपभैय्या पाटील, रवींद्रभैय्या पाटील यांनी मनोगतामध्ये दहावी-बारावी नंतर खरे शिक्षण सुरू होत असल्याचे सांगून ध्येय डोळ्यांत ठेवून नियोजन करा, सोशल मिडियात गुंतू नका, असा सल्ला दिला.
भविष्याही सेवाभावी कार्य- शिरीष चौधरी
हा परीसर शिक्षणाच्या बाबतीत समृद्ध असून त्याला लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे निस्वार्थ प्रयत्न दडलेले आहेत, असे सांगून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भविष्यात कोणकोणते सेवाभावी कार्य करणार आहोत याची माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
माजी आमदार रमेश चौधरी, फैजपूर पालिकेचे उपनगराध्यक्ष रशीद तडवी, सावदा पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेवक कलीम मणियार, तापी परीसर विद्या मंडळ चेअरमन लिलाधार चौधरी, अजित पाटील, यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.जे.जी.ढोले, प्रा.मनिषा पाटील, प्रा.हेमलता चौधरी, प्रा.बी.आर.डोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुस्नेह संस्था परीवाराचे सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.