मधूकरला थकहमी पत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

0

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन : मसाकाला सदिच्छा भेट

फैजपूर- मधुकर सहकारी साखर कारखाना घेल्या 40 वर्षापासून अखंड सुरू असून या कारखान्याची चाके थांबायला नको म्हणून आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील व सर्व संचालकांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले. महसूल मंत्री पाटील यांनी सांगितले की, मधुकर सहकारी साखर कारखान्याला शासनाकडून थकहमी पत्र मिळवून देण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करू शिवाय शासनाकडून कर्ज मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

29 रुपयांखाली साखरेची विक्री नाही
महसूल मंत्री म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यासाठी एक चांगला आणि धाडसी निर्णय घेतला आहे. साखर 29 रुपयेच्या खाली विकली जाणार नाही जेणेकरून जे साखरेच्या भावात चढ- उतार होत होते ते आता स्थिर झाले आहेत जेणेकरून याचा फायदा साखर कारखान्याला होणार आहे अन्यथा अनेक कारखाने बंद झाले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मी मधुकरला थकहमी पत्र देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

यांची होती उपस्थिती
अटल महाकृषी शिबिरासाठी आलेल्या महसूलमंत्र्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, आमदारउन्मेश पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, जिल्हा परीषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कामगार युनियन कडून अध्यक्ष किरण चौधरी व सदस्यांनी 24 महिन्याचे थकीत पगारासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले.