मुंबई : मराठी बिग बॉसची विजेती मेघा धाडेनं हिंदी बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून घरचं चित्रच बदललं आहे. घरात प्रवेश केल्यानंतर अल्पावधितच मेघानं अनुप जलोटांना नॉमिनेट केलं अन् बिग बॉसच्या विजेतेपदचा किताब पटकावण्याचं अनुप यांचं स्वप्न भंगलं.
‘पण, मला घरातून बाहेर काढल्याबद्दल मेघाला खूपच वाईट वाटलं, तिनं यासाठी माझी माफी देखील मागितली. घरातील इतरांच्या तुलनेत मला समजून घेणं तिला अवघड गेलं, म्हणूनच मेघानं मला नॉमिनेट केल्याचं तिनं मला सांगितलं’ असं अनुप घरातून बाहेर पडल्यानंतर बोलले.
‘मेघानं या खेळात डॉक्टरेट पदवी मिळली आहे. नेमकं काय करायचं हे तिला चांगलच माहिती आहे. मात्र मधूनच खेळात सहभागी झालेले खेळाडू कधीही जिंकत नसतात’ असं म्हणत मेघाची जिंकण्याची संधी ही खूपच कमी असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.