मध्यप्रदेशमधील ४० युवक नवापूर पोलिसांच्या निगराणीत

0

नवापूर: कोरोना महाविषाणुचा पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशद्वारावर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. याठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर येथुन नवापूर शहरात येणाऱ्या १२ जणांना प्रवेशद्वाराजवळ बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी पोलीस विभाग व आरोग्य विभागाचा मदतीने होमक्वारंटाइन केले होते. आजही
नवापूर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील ४० युवकांना ताब्यात घेतले आहे.
नवापूर शहरातील जुना आरटीओ तपासणी नाक्याजवळ  गुजरात राज्यातील किम गावातून पायी चालत आलेल्या ४० युवकांना नवापूर पोलिसांनी निगराणीत ठेवले आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांची सोय केली जात आहे. या युवकांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करण्याची आवश्यकता होती. परंतु उघड्यावर  बसलेल्या ह्या युवकांची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासने गंभीर दखल घेऊन हलगर्जी करु नये अशी अपैक्षा व्यक्त होत आहे.या युवकांची आरोग्य तपासणी करुन आवश्यकता असल्यास होमक्वारंटाइन करण्याची गरज आहे.