भोपाळ- काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह त्याच्या मुलावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. राहुल गांधी यांनी मुलावर आरोप केल्याने चिडलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा पवित्रा जाहीर करताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एक पाऊल मागे गेले आहेत. ‘
मध्य प्रदेशमध्ये भ्रष्टाचार इतका आहे की मी विसरुनच गेली की त्यांनी पनामा पेपर्स घोटाळा केला नसून व्यापम घोटाळा, ई टेंडर घोटाळा केला’, असे सांगत राहुल गांधी यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मुलावर आरोप केल्याने राहुल गांधींविरोधात शिवराजसिंह चौहान दखन करणार मानहानीचा दावा