भुसावळ- मध्यप्रदेशातील इसमाचा भुसावळात अति मद्य सेवनाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली. बबलू रामदयाल लामकुचे (40, टेंभूर्णी, जि.हरदा, मध्यप्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. आरपीडी रोडवरील एका चर्चजवळ लामकुचे यांचा मृतदेह आढळल्याने शहर पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणी जयराम रामदयाल लामकुचे (दुर्गा माता मंदिराजवळ, भुसावळ) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार गजानन देशमुख करीत आहेत.