मध्यप्रदेशातील दोघा आरोपींना चोरीच्या कॉपर वायरसह पकडले

0

भुसावळ तालुका पोलिसांची कारवाई : 17 हजार 400 रुपयांची वायर जप्त

भुसावळ : भुसावळ तालुका पोलिसांनी गस्तीदरम्यान मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडील 17 हजार 400 रुपये किंमतीची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कुर्‍हेपानाचे परीसरातील शेतकर्‍यांच्या शेतातून वायर्स चोरी केल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या चोर्‍या आरोपींनी केल्याची कबुली तालुका पोलिसांना दिली आहे. रमेश बद्री भिलाला (रा.खरगोन) व जगन उर्फ रायशिंग बारेला (खरगोन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तालुका पोलिस गस्तीवर असताना फेकरीनजीक आरोपी संशयास्पद स्थितीत उभे असताना त्यांना पकडण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून 14 हजार 400 रुपये किंमतीची 700 फूट कॉपर वायर जप्त करण्यात आली. ही कारवाई उप विभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार युनूस मुसा शेख, युनूस शेख इब्राहीम, प्रेमचंद सपकाळे राजेंद्र पवार आदींनी केली.