सातपुड्यात यावल पोलिसांची कारवाई ; शस्त्र तस्करी उघड होण्याची आशा
यावल- तालुक्यातील वाघझिर्याजवळील सातपुडा पर्वतात लसनबर्डी आदिवासी वस्तीवरून एका संशयीतास एक जिवंत काडतूस व ऑटोमॅटीक रिव्हॉल्व्हरसह अटक करण्यात आली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजु उर्फ राजाराम फुलसिंग बारेला (30, चिरमिळ्या, ता.सेंधवा, जि.खरगोन मध्यप्रदेश) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी हवालदार अविनाश चौधरी, पांडूरंग सपकाळे, दिलीप तायडे, संजीव चौधरी, संमित बाविस्कर, शैलेंद्र बनसोडे या पथकासह तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या वाघझिरा येथुन सातपुड्याच्या वनात सुमारे तीन किमी अंतरावर लसनबर्डी हा सुमारे 15 झोपड्यांच्या पाड्यातून संशयीतास अटक केली. तपास पोलिस निराीक्षक डी. के. परदेशी, उपनिरिक्षक अशोक आहिरे, उपनिरिक्षक एम.जे.मोरे, हवालदार संजय तायडे करीत आहेत.