मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा दोन लाखांचा मद्यसाठा पकडला

0

शहादा। मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा अवैधरित्या मद्यसाठ्याचा ट्रक म्हसावद पोलिसांनी सापळा रचून सुलतानपूर फाट्याजवळ ताब्यात घेतला. 1 लाख 98 हजार किंमतीचा मुद्देमालासह 1 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मारूती व्हॅन व दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

म्हसावद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, खेतीयाहून म्हसावद मार्गे शहाद्याकडे येणारे वाहनात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याचे कळाले. पोलिसांनी सापळा रचून सुलतानपूर फाट्याजवळ येणार्‍या वाहनाची चौकशी केली असता मारूती पांढर्‍या रंगाची मारूती क्र. एमएच 15 एफ 4563 यात 44 बॉक्स देशी दारू डिकीज रचून ठेवण्यात आले होते. या बॉक्सची किंमत 1 लाख 98 हजार आहे व मारुती व्हॅनची किंमत 1 लाख 50 हजार आदी सुमारे 3 लाख 48 हजार रु.किंमतीचा मुद्देमाल मुख्य आरोपी मुकेश चौधरी खेती ह.मु.शहादा व सह आरोपी अनिल शिवाजी शिरसाठ मु.पानसेमल यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमालासह हस्तगत केला.