खेडदिगर येथे पोलिसांची कारवाई ; गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
शहादा- महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या खेडदीगर, ता.शहादा येथे उपअधीक्षक महारु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावर पोलीस ठाण्याच्या पथकाने शस्त्र तस्करी करणार्या दोघांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे जप्त केले. 12 मे रोजी रात्री मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात दोन जण गावठी कट्टे विक्रीसाठी आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी खेडदिगर बस स्थानक परीसरात सापळा रचला. संशयीत रीपू राजू मोरे (25, रा. पानसेमल), राजेश भगवान गोले (वय 22, रा.पानसेमल) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन गावठी कट्टे, दोन दुचाकी व दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी महारु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दाभाडे, हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल छोटू शिरसाठ, काटके, भाऊसाहेब गिरासे, सूर्यवंशी, विश्वास साळुंखे यांच्या पथकाने केली.