मध्यप्रदेश पाठोपाठ दिल्ली सरकारने आणली तीर्थयात्रा योजना !

0

नवी दिल्ली- मध्य प्रदेश सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करून दिली होती. त्याच धर्तीवर दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करून देणार आहे. त्यासाठी आजपासून प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपल्यापेक्षा मोठे आणि वरिष्ठांचा जी व्यक्ती आदर करू शकत नाही ती व्यक्ती कधीही प्रगती करत नाही असे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

या योजनेकरिता वरिष्ठ नागरिकांची निवड ‘पहले आओ पहले पाओ’च्या आधारवर केली जाणार आहे. १००० ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा सरकार करून देणार आहे. ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.