मध्यप्रदेश विधानसभा उपसभापतींच्या ताफ्यातील कारचा अपघात; तीन पोलिसांसह चार जण ठार

0

भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभेच्या उपसभापती हिना कावारे यांच्या ताफ्यातील एका कारला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन पोलिसांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

ट्रक चालकाची पत्नी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होती. तिला प्रसूती कळा सुरु झाल्याचे समजल्यानंतर लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगात ट्रक पळवत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रक चालकाला लगेच अटक करण्यात आली. रात्री १२ च्या सुमारास ट्रक चालकाच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. अपघातात जखमी झालेल्या एका पोलिसाला अधिक चांगल्या उपचारांसाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लानजीमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या हिना कावारे उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच बालाघाट येथे गेल्या होत्या.