मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग

0

महिलेची गॅलरीतून उडी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून अज्ञात आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने या आरोपीच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये महिलेचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.5) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास रहाटणीतील महाराष्ट्रनगरी येथे घडला. याप्रकरणी संबंधित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी रात्री एकटीच घरामध्ये होती. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास अज्ञात आरोपी फिर्यादीच्या घरी आला. तो बळजबरीने फिर्यादी महिलेच्या घरात घुसला. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी अश्‍लील भाषेत संवाद साधला. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या आरोपीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी फिर्यादी महिलेने शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये महिलेचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून डावा हाताच्या बोटाला मार लागला आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे, पोलिसांनी सांगितले.