मध्यरात्री पेट्रोल पंप लुटण्याचा डाव : सतर्कतेने दोघे लुटारू जाळ्यात

Attempt to loot petrol pump in Sakri taluka foiled by vigilant personnel : Two Arrested धुळे : साक्री तालुक्यातील देवनगर येथील सुशांक सर्वो सेंटर हा पेट्रोल पंप लुटीच्या उद्देशाने आलेल्या त्रिकूटांपैकी दोघा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयीत आकाश थोरात व जितेंद्र वेंदे यांच्यासह अन्य एक संशयीत दुचाकीवरून हातात शस्त्राद्वारे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सोमवारी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास आल्यानंतर पंप कर्मचार्‍यांमध्ये झटापट झाल्यानंतर एकाला पकडण्यात यश आले व पोलिसांना माहिती दिल्यानंतर दुसर्‍या संशयीताच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

दरोड्याचा डाव उधळला
आकाश शिवा थोरात (20, इच्छापूर, ता.साक्री) हा संशयीत दुचाकी (एम.एच.18 बी.के.5368) द्वारे अन्य दोन साथीदारांसोबत सोमवारी मध्यरात्री पेट्रोल पंप लुटीसाठी आल्यानंतर पंपावरील कर्मचार्‍यांमध्ये झटापट झाल्यानंतर दोन संशयीत पसार झाले तर आकाश यास पकडून ठेवल्यानंतर साक्री पोलिसांना सूचित करण्यात आले. आकाशच्या माहितीवरून जितेंद्र कैलास बेंदें (21, इच्छापूर, ता.साक्री) यासदेखील अटक करण्यात आली तसेच घातक शस्त्रही जप्त करण्यात आली.