मुंबई । रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरदेखील ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत राहणार आहे. कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप धिम्या तसेच सेमी जलद मार्गांवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 मिनीटांपर्यत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान कल्याण येथून सुटणार्या लोकल मुलुंड स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे. माटुंगा स्थानकावरून पुन्हा या लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. मेगाब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकांवर लोकलचा थांबा नसणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान बोरिवली ते नायगाव दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटी येथून सुटणार्या सर्व डाऊन जलद लोकल सकाळी 10.05 ते दुपारी 2.54 दरम्यान कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि दिवा स्थानकात थांबतील. कल्याण येथून सुटणार्या सर्व डाऊन लोकल मेगाब्लॉक दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांमध्ये थांबणार आहेत. वाशी ते नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर देखील सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वांगणी येथे येथे स्वीच बदलण्याच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 2.20 ते रविवारी सकाळी 6.10 वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्याहून कर्जतला जाणार्या सकाळच्या दोन लोकल कल्याण पर्यंतच चालवण्यात येणार आहे.