भोपाळ- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. कॉंग्रेस बहुमतापासून केवळ दोन जागा दूर राहिल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे साहजिकच कॉंग्रेस अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करणार आहे. तसा दावा देखील कॉंग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा केला आहे. तसेच, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना एक पत्र पाठवून सत्ता स्थापनेचे आमंत्रण देण्याची मागणी केली आहे. सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आम्हाला बोलवावे, त्यांच्यासमोर आम्ही बहुमत असल्याचे सिद्ध करुन दाखवू असे कमलनाथ यांनी सांगितले. काही अपक्षांचा पाठिंबा असल्याचाही काँग्रेसचा दावा आहे.